
मेक्सिकोमध्ये एक बस १३१ फूट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १८ जणांना मृत्यू झाला आहे. तर २० हुन अधित जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या बसमध्ये ४२ प्रवासी प्रवास करत असल्याचं सांगितलं जात आहे. मेक्सिको शहरातून उत्तर-पश्चिमेकडून टिजुआना येथे जात होती. या भीषण अपघातात २३ लोकांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमधून स्थानिक आणि विदेशी प्रवासी प्रवास करत होते. यावेळी ही बस १३१ फूट खोल दरीत कोसळली.
मेस्किनक राज्यातील नायरित येथे गुरुवारी पहाटे ही बस दरीत कोसळल्याने यात १८ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. यात ६ भारतीय नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये अनेक भारतीय नागरिक देखील होते. तसंच इतर देशांतील देखील नागरिक या प्रवाश्यांमध्ये होते. त्यात डोमिनिकन, रिपब्लिक आणि आफ्रिकन दोशांच्या नागरिकांचा समावेश आहे. सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर बचाव पथकांनी तात्काळ अपघात ग्रस्तांना बसमधून काढण्याच्या कामाला सुरुवात केली. तसंच या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मेक्सिको राज्याची राजधानी टेपिकजवळ हा भीषण अपघात घडला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून वळणावर तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. यामुळे हा अपघात झाल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.