२०५० पर्यंत जगात २५० कोटी लोक बहिरे होणार

सध्या फ्रान्सच्या चारपैकी एका व्यक्तीला सध्या ऐकण्याची समस्या आहे
२०५० पर्यंत जगात २५० कोटी लोक बहिरे होणार

सध्या मोबाईल फोनचे वेड सर्वत्र पसरले आहे. त्याचबरोबर हेडफोनचा वापर वाढला आहे. प्रत्येक जण कानात हेडफोन घालून गाणी, चित्रपट, फोनवर बोलत असतो. याचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होत आहे. येत्या २०५० पर्यंत जगात २५० कोटी लोक बहिरे होण्याचा अहवाल फ्रान्सच्या राष्ट्रीय आरोग्य व वैद्यकीय संशोधन संस्थेने दिला आहे.

सध्या फ्रान्सच्या चारपैकी एका व्यक्तीला सध्या ऐकण्याची समस्या आहे. ते हळूहळू बहिरे होत आहेत. म्हणजेच २५ टक्के लोकसंख्या बहिरी झाली आहे. फ्रान्समध्ये १८ ते ७५ वयोगटात १,८६,४६० जणांचे संशोधन करण्यात आले. यात बहुतांशी लोकांना ऐकण्याची समस्या, लाईफस्टाईल, सामाजिक विलगीकरण, वैफल्य व मोठा आवाज यामुळे त्रास होऊ लागला आहे.

काही लोकांमध्ये साखर व वैफल्यामुळे ऐकण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही लोकांना एकटेपणा, शहरातील आरडाओरड, हेडफोनचा अतिवापर यामुळे त्रास होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, जगातील १५० कोटी जणांना सध्या ऐकण्याच्या समस्येने हैराण केले आहे. ही संख्या २०५० पर्यंत २५० कोटी होईल.

फ्रान्समध्ये ३७ टक्के लोक ऐकण्यासाठी मशीनचा वापर करतात. ही वाढती समस्या लक्षात घेऊन फ्रान्सच्या आरोग्य विभागाने कानाची समस्या असणाऱ्या लोकांना मोफत ऐकण्याची मशीन दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in