आता कॅलिफोर्नियातही भरणार 'हिंदी'चे वर्ग; दोन सरकारी शाळांमध्ये केला जाणार जागतिक भाषा म्हणून समावेश

FUSD मंडळाचे सदस्य विवेक प्रसाद, शेरॉन कोको, लॅरी स्वीनी आणि अध्यक्ष याजिंग झांग यांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दर्शविला दिला. तसेच, विद्यार्थ्यांचे कल्याण हा त्यांच्या निर्णयातील एक प्रमुख घटक असल्याचे नमूद केले.
आता कॅलिफोर्नियातही भरणार 'हिंदी'चे वर्ग; दोन सरकारी शाळांमध्ये केला जाणार जागतिक भाषा म्हणून समावेश

कॅलिफोर्नियातील 'सिलिकॉन व्हॅली' येथील दोन सरकारी शाळांच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच जागतिक भाषा म्हणून हिंदी भाषेचा समावेश केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी विषय म्हणून हिंदी भाषा निवडता येणार आहे. फ्रेमोंट येथे मोठ्या प्रमाणावर असलेल्या भारतीय अमेरिकन समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्या मुलांना शाळेमध्ये हिंदी शिकायला मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. कॅलिफोर्नियातील फ्रेमोंटमध्ये भारतीय अमेरिकन लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या 2024-2025 शालेय वर्षासाठी हॉर्नर मिडल स्कूल आणि इर्विंग्टन हायस्कूलच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा समावेश व्हावा, यासाठी फ्रेमोंट युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्ट (FUSD) बोर्डाने 17 जानेवारी रोजी एक पथदर्शी कार्यक्रम सुरू करण्यासाठी मतदान केले. हा प्रस्ताव 4-1 या फरकाने मान्य करण्यात आला. हॉर्नर मिडल स्कूल आणि इर्व्हिंग्टन हायस्कूलमध्ये भारतीय अमेरिकन समुदायाच्या मुलांची संख्या 65 टक्के एवढी आहे.

FUSD बोर्ड सदस्यांचा निर्णयाला पाठिंबा-

FUSD मंडळाचे सदस्य विवेक प्रसाद, शेरॉन कोको, लॅरी स्वीनी आणि अध्यक्ष याजिंग झांग यांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दर्शविला दिला. तसेच, विद्यार्थ्यांचे कल्याण हा त्यांच्या निर्णयातील एक प्रमुख घटक असल्याचे नमूद केले.

"जर हे यशस्वी झाले तर इतर शाळांना हिंदी शिकवायची असेल, तर ते भविष्यात तस करू शकतील. त्यामुळे या क्षणी मी यांच्या बाजूने आहे", अशी प्रतिक्रिया मंडळाचे सदस्य शेरॉन कोको यांनी या प्रस्तावाला समर्थन देताना दिली. तसेच, "मला खात्री आहे की हा उपक्रम सर्व हायस्कूल आणि सर्व माध्यमिक शाळांमध्ये जाईल आणि तेही तो स्वीकारतील", असा विश्वास लॅरी स्वीनी यांनी प्रस्तावाला समर्थनार्थ देताना व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in