
बँकॉक : चीन व अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर कंबोडिया-थायलंडमध्ये सोमवारी युद्धविराम झाला. ‘दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी तत्काळ युद्ध रोखण्यात येत आहे’, असे कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी जाहीर केले.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे कंबोडिया-थायलंडमध्ये शांतता चर्चा झाली. या बैठकीत थायलंडकडून हंगामी पंतप्रधान फुमथम वेचायाचाई आणि कंबोडियातर्फे पंतप्रधान हुन मानेट यांनी सहभाग घेतला. या बैठकीचे अध्यक्षस्थान मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी भूषवले.
कंबोडिया-थायलंडमध्ये सीमेवरून सुरू असलेल्या वादात गेले काही दिवस संघर्ष सुरु असून त्यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.