Canada Plane Crash: कॅनडात भीषण विमान अपघात ; दोन भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू

अभय गरुड आणि यश रामुगडे असं मरण पावलेल्या दोन्ही भारतीय शिकाऊ पायलटची नावं आहेत.
Canada Plane Crash: कॅनडात भीषण विमान अपघात ; दोन भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू

कॅनडामध्ये एक भीषण विमान दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन भारतीय ट्रेनी पायलटचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अभय गरुड आणि यश रामुगडे असं मरण पावलेल्या दोन्ही भारतीय शिकाऊ पायलटची नावं आहेत. या दुर्घटनेत एकून तीन जणांना आपला प्राण गमवावं लागलं आहे. कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.

हे दोन इंजिन असलेल्या कमी वजनाचं विमान पायपर पीए-३४ नेनेसा, ब्रिटिश कोलंबियाच्या चेविवैक शहरात अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उंच झाडांना धडक बसल्याने या विमानाला अपघात झाला आहे. यात दोन भारतीय पायलटसह अन्य एका पायलटच्या मृत्यू झाला आहे.

या अपघात मृत्यू झालेले दोन्ही भारतयी पायलट हे मुंबईचे असल्याचं सांगण्यात येत आहे. या विमान अपघातातबाबत माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in