कॅनडामध्ये शाळेत गोळीबार; हल्लेखोरासह १० जणांचा मृत्यू

पोलिसांनी शाळेत प्रवेश केला तेव्हा अधिकाऱ्यांना अनेक जण मृतावस्थेत आढळले. तसेच गोळीबार करणारी व्यक्तीही मृतावस्थेत आढळली. त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
कॅनडामध्ये शाळेत गोळीबार; हल्लेखोरासह १० जणांचा मृत्यू
कॅनडामध्ये शाळेत गोळीबार; हल्लेखोरासह १० जणांचा मृत्यू Photo : X (@WeAreCanProud)
Published on

व्हॅंकुव्हर : कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या ईशान्य भागात एका हायस्कूलमध्ये मंगळवारी गोळीबार झाला. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

तपास अधिकाऱ्यांनी शाळेत गोळीबार करणाऱ्याची ओळख पटवली आहे. परंतु त्यांनी अद्याप त्याचे नाव जाहीर केलेले नाही, हल्लेखोराने गोळीबार का केला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पीडितांचा गोळीबार करणाऱ्यांशी कसा संबंध आहे, याचा तपास पोलीस अजून करत आहेत.

पोलिसांनी शाळेत प्रवेश केला तेव्हा अधिकाऱ्यांना अनेक जण मृतावस्थेत आढळले. तसेच गोळीबार करणारी व्यक्तीही मृतावस्थेत आढळली. त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in