भारताचा कॅनडाला आणखी एक दणका! कॅनडियन नागरिकांना व्हिसा नाही

भारत आणि कॅनडा यांच्यातील कटूता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. राजकीय लढ्याचं रुपांतर आता आर्थिक लढ्यात झाल आहे.
भारताचा कॅनडाला आणखी एक दणका!  कॅनडियन नागरिकांना व्हिसा नाही
Published on

भारत आणि कॅनडा यांच्यातील कटूता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. राजकीय लढ्याचं रुपांतर आता आर्थिक लढ्यात झाल आहे. हा प्रश्न सुटण्याऐवजी आणखीनच गुंतागुंतीची होत चालली आहे. या परिणाम आता उद्योग, शिक्षण अशा क्षेत्रांवर होताना दिसत आहे. दरम्यान, आता भारताने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे. कॅनडातून भारतात येणाऱ्या कॅनडियन नागरिकांना व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे.

बीएलएस इंटरनॅशनल वेबसाइटच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आजपासून कॅनडाहून भारतात येणाऱ्यांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

कॅनडाचा व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्यांसाठी ही सेवा बंद करण्यात आली आहे. नोटीसमध्ये "भारतील मिशनकडून महत्वाची माहिती- ऑपरेशनल कारणांमुळे,२१ सप्टेंबर २०२३ (गुरुवार)पासून, पुढील सुचना मिळेपर्यंत भारतीय व्हिसा सेवा बंद करण्यात आल्या आहेत," असं म्हटलं आहे.

गेल्या तीन दिवसंत भारताने कॅनडावर कडक कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधी खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. यानंतर त्यांनी भारतीय राजदूला कॅनडातून निघून जाण्याचे आदेश दिले. भारताने देखील तात्काळ ट्रुडोंनी केलेले आरोप फेटाळले. तसंच कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांची भारतातून हकालपट्टी केली.

यानंतर कॅनडातील काही भागांमध्ये भारतविरोधी कारवाया सुरु आहेत. ते लक्षात घेऊन भारतीय नागरिकांनी कॅनडात प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. तसंच कॅनडात शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सकर्क रहावं, अशा सुचना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. भारतविरोधी कारवायांना विरोध करणाऱ्या लोकांवर कॅनडात हल्ले होण्याचे प्रकार काही भागांत घडले आहेत.त्यामुळे भारतीयांनी त्या भागात प्रवास करणं टाळवं, असं भारतीय परराष्ट्र मंत्रायलाने म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in