Chandrababu Naidu Arrest : आंध्रात टीडीपीचे कार्यकर्ते आक्रमक ; ठिकठिकाणी आंदोलन करत जाळपोळ

टीडीपीचे कार्यकर्त्यांनी चित्तूरमध्ये सरकारी बसेसवर दडक फेक केली असून ठिकठिकाणी जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Chandrababu Naidu Arrest : आंध्रात टीडीपीचे कार्यकर्ते आक्रमक ; ठिकठिकाणी आंदोलन करत जाळपोळ

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे प्रमुख (Telgu Desam Party)प्रमुख चंद्राबाबू नायडू(Chandrababu Naidu) यांना न्यायालयीन कोठडीचे पडसाद आंध्रप्रदेश राज्यात उमटताना दिसत आहेत. टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन सुरु केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. चंद्राबाबू नायडू यांची रविवारी तुरुंगात रवानगी करण्यात आली. न्यायालयाने चंद्राबाबूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याचं पार्श्वभूमीलवर टीडीपीचे कार्यकर्त्यांनी चित्तूरमध्ये सरकारी बसेसवर दडक फेक केली असून ठिकठिकाणी जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

चंद्राबाबूंना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरसोड केली आहे. आंध्रप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी राज्यात कलम १४४ लागू केलं आहे.

टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून जनगमोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्ये अडवून रस्त्यावर टायर जाळून प्रवाशी वाहतून बंद करण्याचा प्रयत्न केला आहेत. पोलिसांनी टीडीपीच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सीडीआयकडून शनिवारी सकाळी चंद्राबाबू नायडू यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्यावर कौशल्य विकास योजनेमध्ये ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना २३ स्पटेंबर पर्यंत न्यायालयीन कोढडी सुनावली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in