स्वस्ताईचा चिनी अर्थव्यवस्थेला फटका

चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चीनचे गर्व्हनर पॅन गाँगशेंग यांनी येत्या काही महिन्यात किंमतीत सुधारणा होतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.
स्वस्ताईचा चिनी अर्थव्यवस्थेला फटका

बिजींग : जगभरात महागाईची समस्या सतावत आहे. त्यामुळे विविध देशांतील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धडपडत आहेत. तर दुसरीकडे चीनमध्ये याच्या उलट स्थिती निर्माण झाली आहे. स्वस्ताईमुळे चीनची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. चीनमध्ये वस्तूंचे दर पडल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे.

चीनचा नोव्हेंबरमधील सीपीआय हा ०.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. नोव्हेंबर २०२० नंतरचा हा नीचांक आहे. नोव्हेंबरमधील सीपीआय हा ०.१ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, प्रत्यक्षात तो ०.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. वस्तू आणि सेवांना मागणीच नसल्यामुळे स्वस्ताईची परिस्थिती ओढवते. त्यामुळे मागणीत वाढ व्हावी आणि वस्तू, सेवांचे दर अधिक खाली जाण्यापासून रोखावेत, हा दबाव आता सरकारवर आहे.

चीन ही जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनमध्ये रिअल स्टेट उद्योग पूर्ण संकटात आहे. या बरोबरीने चीनमध्ये तरुणांतील बेरोजगारी ही मोठा आर्थिक समस्या बनली आहे. त्यातून अर्थव्यवस्थेतील मागणी घटलेली आहे. चीनमध्ये सीपीआय कमी घटण्याची सुरुवात फेब्रुवारीमध्ये झाली आणि हा सीपीआय जुलैपासून नकारात्म व्हायला सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये यात थोडी सुधारणा झाली, पण ऑक्टोबरमध्ये सीपीआय पुन्हा घटू लागला. सुरुवातीला सीपीआयची घट ही फक्त वस्तूंपुरती मर्यादित होती, ती आता सेवाक्षेत्रातही पोहोचली आहे. चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चीनचे गर्व्हनर पॅन गाँगशेंग यांनी येत्या काही महिन्यात किंमतीत सुधारणा होतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in