तैवानी उपाध्यक्षांच्या अमेरिका भेटीवरून चीनचा संताप

तैवानमध्ये पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका होत असून विल्यम लाई हे त्यातील आघाडीचे उमेदवार मानले जात आहेत
तैवानी उपाध्यक्षांच्या अमेरिका भेटीवरून चीनचा संताप

तैपेई : तैवानचे उपाध्यक्ष विल्यम लाई यांच्या अमेरिका भेटीवरून चीनने संताप व्यक्त केला असून तैवानला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.

वास्तविक, तैवानचे उपाध्यक्ष विल्यम लाई दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात नवनियुक्त अध्यक्ष सँटियागो पेना यांच्या शपथविधीसाठी जात आहेत. त्यांची अमेरिका भेट अधिकृत नाही. पॅराग्वेला जाताना वाटेत ते अमेरिकेत थांबले आहेत. मात्र, चीनने तेवढ्यावरूनही आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. तैवानच्या उपाध्यक्षांच्या अमेरिका भेटीवर चीन बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याबद्दल चीन निर्धारपूर्वक आणि कठोर कारवाई करेल, असा इशारा चीनने तैवानला दिला आहे. तैवानमध्ये पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका होत असून विल्यम लाई हे त्यातील आघाडीचे उमेदवार मानले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in