मादुरो व त्यांच्या पत्नीला तत्काळ सोडा! चीनची अमेरिकेकडे मागणी

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला अमेरिकेने अटक केली आहे. राष्ट्राध्यक्षांना या पद्धतीने आपल्या देशात नेणे चुकीचे आहे. हे प्रकरण चर्चेने सुटले पाहिजे. मादुरो व त्यांच्या पत्नीची अमेरिकेने तत्काळ सुटका करावी, अशी मागणी चीनने केली आहे.
मादुरो व त्यांच्या पत्नीला तत्काळ सोडा! चीनची अमेरिकेकडे मागणी
मादुरो व त्यांच्या पत्नीला तत्काळ सोडा! चीनची अमेरिकेकडे मागणीPhoto : X
Published on

वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला अमेरिकेने अटक केली आहे. राष्ट्राध्यक्षांना या पद्धतीने आपल्या देशात नेणे चुकीचे आहे. हे प्रकरण चर्चेने सुटले पाहिजे. मादुरो व त्यांच्या पत्नीची अमेरिकेने तत्काळ सुटका करावी, अशी मागणी चीनने केली आहे.

उत्तर कोरियाने व्हेनेझुएलावरील अमेरिकन कारवाईला गुंडशाही म्हटले आहे. व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्य व सार्वभौमत्वावर हा मोठा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर कोरियाने दिली आहे.

न्यूयॉर्कचे महापौर जोहराम ममदानी यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेबाबत नाराजी व्यक्त केली. हे पाऊल आंतरराष्ट्रीय व अमेरिकन कायद्याचे उल्लंघन आहे.

भारताला थेट फायदा

व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण आल्यानंतर त्याचा थेट लाभ भारताला मिळणार आहे. भारताच्या थकित १ अब्ज डॉलरची वसुलीही होण्याची शक्यता आहे. तसेच व्हेनेझुएलातील भारतीय कंपन्यांकडून सुरू असलेल्या तेल उत्पादनात वाढू होऊ शकते. एकेकाळी भारत हा व्हेनेझुएलाकडून चार लाख पिंप कच्चे तेल आयात करत होता. २०२० पासून अमेरिकन निर्बंधामुळे यात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तसेच व्हेनेझुएला सरकारने ओएनजीसी विदेशच्या ४० टक्के भागीदारीतील ५३.६ कोटी अमेरिकन डॉलरचा लाभांश अजूनही दिलेला नाही. आता अमेरिकेने व्हेनेझुएलाचे तेल आपल्या ताब्यात घेतल्यास निर्बंधातून सवलत मिळू शकते.

मादुरो यांच्या अटकेनंतर जगात भीतीचे वातावरण

व्हेनेझुएलावर अमेरिकन सैन्याने कारवाई केल्यानंतर त्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. आता व्हेनेझुएलाचे सरकार अमेरिका चालवणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील या कारवाईमुळे जगात तणाव पसरला आहे.

logo
marathi.freepressjournal.in