विमानवाहू युद्धनौका ‘फुजियान’ चिनी नौदलात दाखल; हिंदी महासागरात चीनचा दबदबा वाढणार

जगातील दुसरी महासत्ता असलेल्या चीनने आपली तिसरी विमानवाहू युद्धनौका ‘फुजियान’ नौदलात दाखल करण्याची घोषणा केली. या समारंभाला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते.
विमानवाहू युद्धनौका ‘फुजियान’ चिनी नौदलात दाखल; हिंदी महासागरात चीनचा दबदबा वाढणार
Published on

बीजिंग : जगातील दुसरी महासत्ता असलेल्या चीनने आपली तिसरी विमानवाहू युद्धनौका ‘फुजियान’ नौदलात दाखल करण्याची घोषणा केली. या समारंभाला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते.

ही युद्धनौका अत्याधुनिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट्स प्रणालीने सुसज्ज आहे. हा अनावरण सोहळा अत्यंत गुप्ततेत पार पडला.

चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’च्या माहितीनुसार, दक्षिण चीनमधील हायनान प्रांतातील सान्या बंदरावर ‘फुजियान’चे अनावरण व कमिशनिंग आणि ध्वजदान समारंभाला शी जिनपिंग यांनी बुधवारी उपस्थिती लावली होती.

‘फुजियान’ ही चीनची सर्वात आधुनिक विमानवाहू नौका मानली जाते. ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टीम या प्रणालीने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या गेराल्ड आर फोर्ड या विमानवाहू नौकेवर वापरली जाते.

दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञान सोडून पुन्हा जुन्या स्टीम-आधारित लाँच प्रणालीकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी हे तंत्रज्ञान ‘महागडे, अविश्वसनीय आणि दुरुस्ती करणे कठीण’ असल्याचे म्हटले होते, असे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे.

या युद्धनौकेवर नवीन पिढीतील जे-३५ आणि जे १५टी लढाऊ विमाने तसेच केजी-६०० ही टेहळणी विमाने तैनात केली आहेत. या युद्धनौकेवरील वैमानिकांशी संवाद साधताना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, त्यांना कौशल्य वृद्धी करण्याचे आणि ‘फुजियान’च्या लढाऊ क्षमतेच्या वृद्धीत योगदान देण्याचे आवाहन केले.

शी जिनपिंग यांनी ‘फुजियान’च्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन उड्डाण संचालन व टेकऑफ-लँडिंग प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच पायलट हाऊसमध्ये जाऊन लॉग बुकवर स्वाक्षरी केली. या युद्धनौकेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट प्रणाली बसवण्याचा निर्णय स्वतः शी जिनपिंग यांनी घेतला होता. या प्रणालीच्या नियंत्रण विभागालाही भेट देऊन कार्यप्रणालीचे निरीक्षण केले, असे ‘शिन्हुआ’ने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in