चीन CPEC चा विस्तार करणार; पाक ते अफगाणपर्यंत रस्ता बांधणार; भारताचा आक्षेप

याद्वारे चीन विस्तारवादाचे धोरण अवलंबून भारताला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचा भारताचा आरोप आहे.
बैठकीत चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 'सीपीईसी'  अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शविली.
बैठकीत चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 'सीपीईसी' अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शविली.
Published on

बीजिंग : बीजिंगमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शविली. पाक परराष्ट्र कार्यालयाने सोशल मीडियावर ही माहिती दिली.

चीनमधील शिनजियांगपासून पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरापर्यंत बांधण्यात येणारा हा कॉरिडॉर अफगाणिस्तानपर्यंत जाईल. या कॉरिडॉरद्वारे, चीन मध्य-पूर्वेतील देशांशी रस्ते संपर्क स्थापित करण्याची योजना आखत आहे.

भारताने ‘सीपीईसी’वर आक्षेप घेतला आहे. ‘सीपीईसी’ हा पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातून जात असून ज्यावर भारताचा दावा आहे. याद्वारे चीन विस्तारवादाचे धोरण अवलंबून भारताला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचा भारताचा आरोप आहे.

logo
marathi.freepressjournal.in