चीन -रशिया लष्करी कवायतीत वाढ

व्यतिरिक्त इराण आणि सिरिया या देशांसोबत देखील चीनने संयुक्त लष्करी कवायती केल्या आहेत.
चीन -रशिया लष्करी कवायतीत वाढ

बीजिंग : अमेरिकेच्या निर्बंधाना न जुमानता चीनने रशियासोबतच्या संयुक्त लष्करी कवायतीत वाढ केली आहे. युक्रेन युद्धाबाबत चीनने अमेरिकेच्या मर्यादांचे पालन केले असले तरी रशियाच्या जवळ जाणे थांबवलेले नाही. चीन आणि पुतीन यांचे सशस्त्र लष्कर यांनी मिळून गेल्या वर्षभरात तब्बल सहा संयुक्त कवायती केल्या आहेत. चीनने २०२२ साली अन्य देशांसोबत केलेल्या कवायतीपैकी ७५ टक्के कवायती एकट्या रशियासोबतच केल्या आहेत. यापैकी पाच कवायती तर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त इराण आणि सिरिया या देशांसोबत देखील चीनने संयुक्त लष्करी कवायती केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in