पाश्चिमात्य देशांविरुद्ध चीन-रशियाची एकजूट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी चीनचे अध्यक्ष क्षि जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या अभूतपूर्व त्रिपक्षीय शिखर परिषदेसाठी दाखल होण्याच्या काही तास आधी, चीन आणि रशियाने पाश्चिमात्य देशांची आर्थिक दबावनीती आणि संरक्षणवादी धोरणांविरोधात एकजुटीचे संकेत दिले.
पाश्चिमात्य देशांविरुद्ध चीन-रशियाची एकजूट
Published on: 

शेनझेन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी चीनचे अध्यक्ष क्षि जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या अभूतपूर्व त्रिपक्षीय शिखर परिषदेसाठी दाखल होण्याच्या काही तास आधी, चीन आणि रशियाने पाश्चिमात्य देशांची आर्थिक दबावनीती आणि संरक्षणवादी धोरणांविरोधात एकजुटीचे संकेत दिले.

शेनझेन येथे बुधवारी दोन स्वतंत्र व्यासपीठांवर चीनचे अध्यक्ष जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आपापली भूमिका मांडली. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील क्वाड (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग) देशांच्या नेत्यांची मनिलामध्ये बैठक झाल्यानंतर लगेचच ही घडामोड घडली.

या बैठकीत अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा आपल्या सामरिक समूहाला सक्रिय केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला प्रत्युत्तर देणे हा या गटाच्या पुनरुज्जीवनामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)