चीनचे चोख प्रत्युत्तर; अमेरिकेवर लादले ‘बंदर शुल्क’

अमेरिकेने चीनवर १०० टक्के टॅरिफ लागू केल्याची घोषणा केल्यानंतर चीननेही अमेरिकेला आता तोडीस तोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. चीनने अमेरिकन जहाजांवर नवीन ‘विशेष बंदर शुल्क’ लावले आहे. चिनी बंदरावर येणाऱ्या अमेरिकन जहाजांसाठी ते तत्काळ लागू केले जाणार आहे.
चीनचे चोख प्रत्युत्तर; अमेरिकेवर लादले ‘बंदर शुल्क’
चीनचे चोख प्रत्युत्तर; अमेरिकेवर लादले ‘बंदर शुल्क’
Published on

बीजिंग : अमेरिकेने चीनवर १०० टक्के टॅरिफ लागू केल्याची घोषणा केल्यानंतर चीननेही अमेरिकेला आता तोडीस तोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. चीनने अमेरिकन जहाजांवर नवीन ‘विशेष बंदर शुल्क’ लावले आहे. चिनी बंदरावर येणाऱ्या अमेरिकन जहाजांसाठी ते तत्काळ लागू केले जाणार आहे.

चिनी जहाज उद्योग व उद्योजकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी चीनने हे विशेष शुल्क लादले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सागरी माल वाहतूक क्षेत्रात नि:ष्पक्ष स्पर्धा होण्यासाठी हा निर्णय घेतला. अमेरिकन कंपनी, संघटनेच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व कंपन्यांवर हे शुल्क लागू केले जाईल. अमेरिकन ध्वज असलेले व अमेरिकेत बनलेल्या जहाजांचा त्यात समावेश असेल.

तसेच दक्षिण कोरियन कंपनी ‘हन्वा ओशन कॉर्पोरेशन’च्या अमेरिकन सहाय्यक कंपन्यांवरही चीनने बंदी घातली आहे. हे निर्बंध तत्काळ लागू केले जातील.

चीनच्या वाणिज्य खात्याने सांगितले की, अमेरिकेची कारवाई ही आंतरराष्ट्रीय कायदा व जागतिक संबंधांच्या मूलभूत सिद्धांताचे उल्लंघन आहे. ज्या चिनी कंपन्यांच्या वैध अधिकार व हितांवर प्रभाव टाकत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in