चीनने जगाला दाखवले शस्त्र भांडार; २० हजार किमी मारक क्षमतेच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राचे प्रदर्शन

अंतराळात हल्ला करणारे क्षेपणास्त्र, आंतरखंडीय अण्वस्त्र क्षेपणास्त्र, पाणबुडी ड्रोन, लेझर शस्त्रे, पाचव्या पिढीची लढाऊ विमानांचे प्रदर्शन करून चीनने आपली लष्करी ताकद जगाला दाखवून दिली.
चीनने जगाला दाखवले शस्त्र भांडार; २० हजार किमी मारक क्षमतेच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राचे प्रदर्शन
Photo : X
Published on

बीजिंग : अंतराळात हल्ला करणारे क्षेपणास्त्र, आंतरखंडीय अण्वस्त्र क्षेपणास्त्र, पाणबुडी ड्रोन, लेझर शस्त्रे, पाचव्या पिढीची लढाऊ विमानांचे प्रदर्शन करून चीनने आपली लष्करी ताकद जगाला दाखवून दिली.

दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाला ८० वर्षे झाल्याप्रकरणी चीनमध्ये विजयी दिवस परेड आयोजित केली होती. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बीजिंगच्या तियानमेन चौकात परेडला सलामी दिली.या कार्यक्रमाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, उत्तर कोरियाचे किंग जोन ऊल, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आदी प्रमुख होते.

चीनने बुधवारी आपल्या भव्य लष्करी परेडमध्ये पहिल्यांदाच अनेक नवी शस्त्रास्त्रे प्रदर्शित केली. यात सर्वाधिक चर्चेतील नवे ‘LY-1’ लेझर शस्त्र विशेष आकर्षण ठरले. आठ चाकांच्या एचझेड-१५५ बख्तरबंद ट्रकवर बसवलेले हे शस्त्र शत्रूच्या शस्त्रास्त्रांचे आणि उपकरणांचे ऑप्टिकल सेन्सर्स निष्क्रिय करू शकते. हे शस्त्र सागरी युद्धाचे नियमच बदलून टाकेल, असे चीनी तज्ज्ञांचे मत आहे.

लेझर युद्धनितीला नवीन लष्करी क्षेत्र मानले जात आहे. चीनने पहिल्यांदाच ‘डीएफ-५ सी’ या द्रव इंधनावर चालणाऱ्या आंतरखंडीय अणु क्षेपणास्त्राचे प्रदर्शन केले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २० हजार किमीपेक्षा अधिक आहे आणि ते जागतिक पातळीवर कुठेही लक्ष्य भेदू शकते.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पहिल्यांदाच आपले ‘जेएल-१’ हे हवेमार्गे डागता येणारे अणु क्षेपणास्त्र प्रदर्शित केले. हे ‘जेएल-३’ क्षेपणास्त्र पाणबुडीवरून सोडल्या जाणाऱ्या अंतरखंडीय क्षेपणास्त्रापेक्षा लहान आहे. ‘डीएफ-५ सी’ एकावेळी दहा वेगवेगळ्या लक्ष्यांवर प्रहार करू शकते. यामुळे शत्रूच्या तळांवर आणि महत्त्वाच्या स्थळांवर एकाच वेळी हल्ला शक्य आहे,” असे तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे चीनची अणु प्रतिरोधक क्षमता अधिक विश्वासार्ह ठरते.

याशिवाय, ‘डीएफ-२६ डी’ हे मध्यम पल्ल्याचे नवे क्षेपणास्त्र प्रदर्शित केले. हे क्षेपणास्त्र अणु किंवा पारंपरिक दोन्ही प्रकारचे शस्त्रास्त्रे नेऊ शकते आणि यांचा पल्ला ५ हजार किमीपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

चीन धमक्यांना घाबरत नाही - जिनपिंग

चीन कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही तर कायम पुढे जातो. जनतेचे इतिहास लक्षात ठेवावा व जपानच्याविरोधात लढणाऱ्या सैनिकांना सन्मान देण्याचे अपील चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in