चिनी Deepseek च्या वादळाने अमेरिकेची झोप उडाली; ChatGPT ला तगडी टक्कर!

सध्याचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. आतापर्यंत अमेरिकेची या क्षेत्रात मक्तेदारी होती. आता चीननेही अमेरिकेला आव्हान दिले आहे. चीनच्या एका स्टार्टअपने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ‘डीपसीक’ हे मॉडेल आणले आहे.
चिनी Deepseek च्या वादळाने अमेरिकेची झोप उडाली; ChatGPT ला तगडी टक्कर!
Published on

बीजिंग : सध्याचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. आतापर्यंत अमेरिकेची या क्षेत्रात मक्तेदारी होती. आता चीननेही अमेरिकेला आव्हान दिले आहे. चीनच्या एका स्टार्टअपने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ‘डीपसीक’ (Deepseek) हे मॉडेल आणले आहे. याची जगभरात चर्चा असून त्यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. अमेरिकेच्या ओपन एआयने बनवलेल्या ‘चॅटजीपीटी’ (ChatGPT) ला चीनच्या एआय असिस्टंट ‘डीपसीक’ने थेट स्पर्धा सुरू केली आहे.

अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्या गुगल, मेटा व ओपन आयची झोप या ‘डीपसीक’ने उडवली आहे. या डीपसेकने ‘एआय टूल’ चॅटजीपीटीलाही मागे टाकले आहे. जगात सर्वत्र ‘डीपसीक’ एआय चॅटबॉटची चर्चा सुरू आहे. याचा मोठा परिणाम अमेरिकेतील मोठी कंपनी ‘एनवीडिया’वर झाला आहे.

‘डीपसीक’ हे खुले एआय असून जगभरातील वापरकर्त्यांसाठी ते मोफत आहे. हे एआय चॅटबॉट चीनच्या हांगझू या तंत्रज्ञान कंपनीने बनवले आहे. या कंपनीची स्थापना लियान वेनफेंग यांनी केली.

‘डीपसेक’ वापरायला मोफत

अमेरिकन कंपन्यांनी बनवलेल्या ‘एआय असिस्टंट’च्या तुलनेत ‘डीपसीक’ बनवायला केवळ ६ दशलक्ष डॉलर्स खर्च आला. विशेष म्हणजे हे ‘डीपसीक’ वापरण्यास मोफत आहे. तसेच त्याचा अमर्याद वापर करता येऊ शकतो. ‘चॅटजीपीटी’ वापरताना ५ तासच तुम्हाला मर्यादित प्रश्न विचारता येऊ शकतात.

डीपसीक’ कसे डाऊनलोड कराल?

ॲॅप स्टोअरवरून ‘डीपसीक’ डाऊनलोड केले जाऊ शकते. तसेच chat.deepseek.com टाइप करून चॅटबॉट अॅक्सेस केले जाऊ शकते. ‘डीपसीक’चा इंटरफेस हा चॅटजीपीटीसारखा दिसतो. तुम्हाला डायलॉग बॉक्समध्ये आपला प्रश्न टाइप करायचा आहे. त्यानंतर एआय चॅटबॉट तुम्हाला उत्तर देईल.

डीपसीक’चे संस्थापक कोण?

‘डीपसीक’चे संस्थापक ४० वर्षीय लियांग वेनफेंग आहेत. ते या कंपनीचे सीईओही आहेत. त्यांचा जन्म चीनच्या झानजियांगमध्ये अत्यंत साधारण कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षणही साध्या शाळेत झाले. मात्र, शिकण्याची त्यांना आवड होती. २०२१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे चीनला चीप निर्यात करण्यावर बंदी घालणार होते. त्यावेळी लियांग यांनी अमेरिकन कंपनी ‘एनवीडिया’चे हजारो ग्राफिक्स खरेदी केले. त्यांच्यासोबतचे लोक त्यांना सणकी समजत होते. या प्रोसेसरच्या मदतीने त्यांनी अनेक एआय मॉडेल्स बनवले. चार वर्षांनंतर त्यांनी ‘डीपसीक’ स्टार्टअपच्या सहाय्याने एआय चॅटबॉट ‘डीपसीक-आर१’चे अनावरण केले. हे ‘डीपसीक’ लियांग यांनी अत्यंत कमी खर्चात तयार केले.

logo
marathi.freepressjournal.in