चीन सरकारचा नागरिकांना नवा फतवा म्हणाले तीन मुले...

चीन सरकारचा नागरिकांना नवा फतवा म्हणाले तीन मुले...

जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटल्याने सरकार काळजीत पडले

जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला व दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता असलेल्या चीनमध्ये जन्मदरात मोठी घट झाल्याने त्यांच्यासमोर समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे चीन सरकारने ‘तीन मुले जन्माला घाला’ असा फतवाच काढल्याचे समजते.

चीनमध्ये ‘एक कुटुंब, एक मूल’ हे धोरण गेले ५० वर्षे राबवण्यात येत आहे. त्यामुळे जनता वृद्ध होत असून कामाला तरुण मिळत नाहीत. जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटल्याने सरकार काळजीत पडले आहे. त्यामुळे आता जबरदस्तीने गर्भधारणा करण्याचे चीनने ठरवले आहे. जनतेला जबरदस्तीने मुले जन्माला घालण्यासाठी दबाव टाकला जाणार आहे.

चीनने आपल्या नागरिकांना लवकर लग्न करण्यासाठी आणि कमीत कमी तीन मुले जन्माला घालण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आहे. तसेच मुले घेण्यासाठी वेगवेगळी आमिषे द्यायला सुरुवात केली आहे.

मुले जन्माला न घालणे किंवा कमी करणे याच्या मागे त्यांची देखभाल हाच प्रश्न आहे. चीनचे अधिकांश आई-वडील हे दावा करतात की, आपल्या मुलांच्या देखभालीसाठी ते आर्थिक सुरक्षेची गॅरंटी देऊ शकत नाही. सध्या कोरोना विषाणू व कडक क्वारंटाईनचे नियम यामुळे चिनी नागरिकांचे जीवन सध्या दबावात आहे. घरात बंद असल्याने कमी जेवण, कमी उत्पन्न व आरोग्य समस्या यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in