Video : अनोखा छापा! व्हॅलेंटाईन डेला पोलीस कर्मचारी बनला Teddy Bear, चॉकलेटच्या नादात तरुणी जाळ्यात अडकली

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्याने 'केअर बिअर्स' या ॲनिमेटेड मालिकेतील पात्राचा वेश धारण केला आणि भेटवस्तू आणि हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन तो तिच्या घरासमोर उभा होता.
Video : अनोखा छापा! व्हॅलेंटाईन डेला पोलीस कर्मचारी बनला Teddy Bear, चॉकलेटच्या नादात तरुणी जाळ्यात अडकली
Published on

एका ड्रग डीलर महिलेला पकडण्यासाठी पेरूमधील पोलिसांनी अनोखी आयडिया अवलंबली. भल्यामोठ्या 'टेडी बेअर'च्या वेशात आणि एका हातात चॉकलेट्सचा बॉक्स व दुसऱ्या हातात हृदयाच्या आकाराचा लाल रंगाचा मोठा फुगा घेऊन एक पोलिस कर्मचारी महिलेच्या घरासमोर उभा राहिला. थोड्याचवेळात महिला जाळ्यात अडकली, गिफ्टच्या नादात ती घराबाहेर आली आणि लगेचच पोलिसांनी तिला बेड्या घातल्या.

राजधानी लिमामध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी संध्याकाळी ही घटना घडली. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, पोलिस कर्मचाऱ्याने 'केअर बिअर्स' या ॲनिमेटेड मालिकेतील पात्राचा वेश धारण केला आणि भेटवस्तू व हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन तो तिच्या घरासमोर उभा होता. त्या परिसरातील अन्य ड्रग तस्करांना संशय येऊ नये यासाठी काही पोलिस तेथे कामगारांच्या वेशात उपस्थित होते.

भेटवस्तूंसोबत टेडी बेअर पाहून आरोपी महिला घराबाहेर आली. ती पायऱ्या उतरून खाली उतरली आणि 'टेडी बेअर'नेच तिला अटक केली. पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टेडी बेअर तिला बेड्या घालताना दिसतोय. त्यानंतर छापेमारी केली असता पोलिसांनी घरातून कोकेनची तब्बल १,५०० हून अधिक पाकिटं जप्त केली.

पेरू नॅशनल पोलिसांच्या ग्रीन स्क्वॉड्रनने यापूर्वीही अटकेसाठी अशी अनोखी पद्धत वापरली आहे. गेल्या ख्रिसमसला, एका गुन्हेगारांला पकडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याने सांताक्लॉजचा पेहराव केला होता.

logo
marathi.freepressjournal.in