इस्रायल-गाझा शस्त्रसंधीवर संकट; नेत्यानाहू सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा

इस्राएल-गाझादरम्यान शस्त्रसंधीची अंमलबजावणी व कैद्यांची अदलाबदल करार लागू होण्यापूर्वीच हा करार संकटात सापडला आहे.
इस्रायल-गाझा शस्त्रसंधीवर संकट; नेत्यानाहू सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा
AFP
Published on

जेरूसलेम : इस्राएल-गाझादरम्यान शस्त्रसंधीची अंमलबजावणी व कैद्यांची अदलाबदल करार लागू होण्यापूर्वीच हा करार संकटात सापडला आहे. नेत्यानाहू सरकारमधील राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतमार बेन ग्विर यांनी या कराराला विरोध करीत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. ग्विर यांनी राजीनामा दिल्यास नेत्यानाहू सरकार पडू शकते.

बेन ग्विर म्हणाले की, गाझा पट्टीत हमाससोबत शस्त्रसंधीच्या घोषणेला मंजुरी मिळाल्यास त्यांचा पक्ष ‘ओत्जमा येहूदित पार्टी’ नेत्यानाहू सरकारचा पाठिंबा काढून घेईल. नेत्यानाहू यांच्या लिकूड पक्षाने ग्विर यांच्या पक्षाच्या धमकीचा निषेध केला आहे, जो कोणीही दक्षिणपंथी सरकार पाडेल. तो कायमच कलंक म्हणून लक्षात राहील.

logo
marathi.freepressjournal.in