युरोपमधील विमानतळांवर सायबर हल्ला; हिथो आणि बर्लिनसह अनेक ठिकाणी विमानाच्या उड्डाणांवर झाला परिणाम

युरोपमधील अनेक विमानतळांवर मोठ्या सायबर हल्ल्यामुळे ब्रसेल्स, हिथ्रो, बर्लिनसह प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे रद्द झाली आहेत. चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टम चालवणाऱ्या सेवा प्रदात्यावर हा हल्ला झाला आहे.
युरोपमधील विमानतळांवर सायबर हल्ला; हिथो आणि बर्लिनसह अनेक ठिकाणी विमानाच्या उड्डाणांवर झाला परिणाम
Photo : X (@malcolmx653459)
Published on

ब्रसेल्स : युरोपमधील अनेक देशांच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ब्रसेल्स, हिथ्रो आणि बर्लिन यासारख्या प्रमुख युरोपीय विमानतळांवर शनिवारी अनेक विमानांना या फटका बसला. यापैकी बहुतांश विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. यावेळी सायबर हल्ल्याने चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टमला संचालित करणाऱ्या सेवा प्रदात्यास लक्ष्य केले आहे.

दरम्यान, ब्रुसेल्स विमानतळ व्यवस्थापनाने म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे स्वयंचलित यंत्रणा बंद झाली, ज्यामुळे केवळ मॅन्युअल चेकइन आणि बोर्डिंग शक्य होऊ शकले. याशिवाय विमानतळाकडून सांगण्यात आले की, १९ सप्टेंबर रोजी रात्री आमच्या सेवा प्रदात्यावर सायबर हल्ला झाला, जो चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टमसाठी जास्त जबाबदार आहे आणि या हल्ल्याने अनेक युरोपीय विमानतळांना प्रभावित केले असून ज्यामध्ये ब्रसेल्स विमानतळाचाही समावेश आहे.

तसेच हिथ्रो विमानतळाने प्रवाशांना लांब पल्ल्याच्या विमानासाठी, म्हणजेच तीन तासांपेक्षा जास्त आणि देशांतर्गत विमानसेवेसाठी दोन तासांपेक्षा जास्त लवकर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, विमानतळांकडून हेही सांगण्यात आले की, ही समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, प्रवाशांना आवाहन आहे की, विमानतळावर पोहोचण्याआधी आपल्या नियोजित विमानाची स्थिती एकदा तपासून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in