पापुआ-न्यू-गिनीतील मृतांची संख्या २००० वर

पापुआ-न्यू-गिनीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढून तो २००० पर्यंत गेल्याची भीती तेथील सरकारने व्यक्त केली आहे.
पापुआ-न्यू-गिनीतील मृतांची संख्या २००० वर
Published on

मेलबर्न : पापुआ-न्यू-गिनीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढून तो २००० पर्यंत गेल्याची भीती तेथील सरकारने व्यक्त केली आहे.

शुक्रवारी पहाटे पापुआ-न्यू-गिनीत झालेल्या भूस्खलनामुळे एक संपूर्ण गाव गाडले गेले. गावात झालेल्या आपत्तीत नेमकी किती जीवितहानी झाली याचा अंदाज करणे कठीण झाले आहे. सुरुवातीला गावात १०० हून अधिक जण ठार झाल्याचे वृत्त आले होते. नंतर संयुक्त राष्ट्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या वृत्तात मृतांचा आकडा ६७० वर गेल्याचे म्हटले होते. तर सोमवारी स्थानिक सरकारने मृतांचा आकडा २००० वर गेल्याची भीती व्यक्त केली आहे.

एन्गा प्रांतातील या आपत्तीग्रस्त गावात ३८०० लोक राहत होते. शुक्रवारी गावाजवळील डोंगर खचून गावावर कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले. बचाव पथके अद्याप गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक ठिकाणी १० मीटरपेक्षा (३२ फूट) जास्त उंचीचा मातीचा थर जमा झाला आहे. तो हटवणे बरेच जिकीरीचे आहे. त्यामुळे गाडल्या गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या आशा हळूहळू मावळू लागल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in