इस्रायलच्या लष्कराला दहशतवादी संघटना घोषित करा! इराणच्या अध्यक्षांचे मुस्लीम देशांच्या संघटनेला आवाहन

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १४०० लोक ठार जाले.
इस्रायलच्या लष्कराला दहशतवादी संघटना घोषित करा! इराणच्या अध्यक्षांचे मुस्लीम देशांच्या संघटनेला आवाहन
Published on

रियाध : इस्रायलच्या लष्कराला दहशतवादी संघटना घोषित करण्यात यावे, अशी मागणी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी इस्लामिक देशांच्या संघटनेला केले आहे.

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे शनिवारी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामी देशांच्या संघटनेची बैठक पार पडली. त्यात इराणचे अध्यक्ष रईसी यांनी ही मागणी केली. तसेच त्यांनी गाझा पट्टीतील इस्रायलच्या सध्याच्या कारवाया उद्धृत करून ज्या राष्ट्रांचे इस्रायलशी संबंध आहेत, त्यांना ते तोडण्यासाठी उद्युक्त केले. त्यांनी पॅलेस्टिनींना अधिक पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मात्र, रईसी यांच्या आवाहनाला सर्वच मुस्लीम देशांनी पाठिंबा दिला नाही. संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) इस्रायलशी राजनैतिक संबंध कायम ठेवण्याचे ठरवले आहे.

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १४०० लोक ठार जाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत आजवर केलेल्या हल्ल्यात ११ हजारांहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. त्यात प्रामुख्याने लहान मुले आणि महिलांचा समावेस आहे. त्यामुळे इराणने इस्रायलच्या लष्कराला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in