आंग सान स्यू की यांची नजरकैदेत रवानगी; तुरुंगातील उष्णतेपासून बचावासाठी कारवाई

हवामान अत्यंत उष्ण असल्याने आंग सान स्यू की यांच्यासह ज्यांना आवश्यक सावधगिरीची गरज आहे अशा सर्वच कैद्यांना आम्ही अन्य ठिकाणी हलवले आहे.
आंग सान स्यू की यांची नजरकैदेत रवानगी; तुरुंगातील उष्णतेपासून बचावासाठी कारवाई

नेपीडॉ : म्यानमारच्या प्रमुख नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आँग सान स्यू की यांना उष्णतेच्या तीव्र लाटेपासून बचावाची उपाययोजना म्हणून तुरुंगातून नजरकैदेत हलवण्यात आले आहे, असे लष्कराने म्हटले आहे. मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सांगितले की, आंग सान स्यू की आणि त्यांच्या पदच्युत सरकारचे अध्यक्ष विन मिंट यांना तुरुंगातून अन्यत्र हलवण्यात आले.

हवामान अत्यंत उष्ण असल्याने आंग सान स्यू की यांच्यासह ज्यांना आवश्यक सावधगिरीची गरज आहे अशा सर्वच कैद्यांना आम्ही अन्य ठिकाणी हलवले आहे. त्यांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी आम्ही ही उपाययोजना करत आहोत, असे ते म्हणाले. झॉ मिन तुन यांनी मुक्त झालेल्या कैद्यांना कोठे हलवले जात आहे हे सांगितले नाही. म्यानमारच्या लष्कराने २०२१ मध्ये सत्तापालट करून ७८ वर्षीय आंग सान स्यू की यांना तुरुंगात टाकले होते. राजकीय आरोपांखाली त्या नेपीडॉ येथे २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. विन मिंट म्यानमारच्या बागो प्रदेशातील टांगू येथे आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in