डेस्टिनेशन वेडिंग आता अंतराळात, स्पेस पर्सपेस्टीव्ह कंपनीची घोषणा : प्रति व्यक्ती १ कोटी खर्च

‘स्पेस पर्सपेस्टीव्ह’ कंपनीने प्रति व्यक्ती १ कोटी रुपयात अंतराळात लग्न करण्याची सुविधा देत आहे
डेस्टिनेशन वेडिंग आता अंतराळात, स्पेस पर्सपेस्टीव्ह कंपनीची घोषणा : प्रति व्यक्ती १ कोटी खर्च

लग्न करायचे म्हणजे हॉल हवा, असा काहीसा आपला समज आहे. पण आता लग्न करण्यासाठी हॉलमध्ये जाणे आऊटडेट झाले आहे. आता डेस्टिनेशन वेडिंगची कल्पना आली आहे. कोणी निसर्गाच्या सानिध्यात लग्न करतो, तर कोणी समुद्र किनाऱ्यावर. पण आता शब्दश: ढगात म्हणजे अंतराळात जाऊन लग्न करण्याची इच्छा पूर्ण करता येणार आहे. ही संधी ‘स्पेस पर्सपेस्टीव्ह’ कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

डेस्टिनेशन वेडिंग आता समाजात सामान्य बाब झाली आहे. वधू-वरासहित कुटुंबालाही आनंद मिळतो. ‘स्पेस पर्सपेस्टीव्ह’ कंपनीने प्रति व्यक्ती १ कोटी रुपयात अंतराळात लग्न करण्याची सुविधा देत आहे. यासाठी कंपनीने अंतराळ यान ‘नेपच्यून’ तयार केले आहे. या यानाच्या खिडक्या मोठ्या असून तुम्हाला पृथ्वीवरील विहंगम दृश्य पाहता येऊ शकतील. पृथ्वीवरून १ लाख फूट उंचीवर तुम्हाला नेले जाणार आहे. सहा तास अंतराळात राहून तुम्हाला परत आणले जाईल. २०२४ पासून ही वेडिंग टूर सुरू होणार असून याची १ हजार तिकीटे यापूर्वीच विकली गेली आहेत.

अंतराळात जाण्यासाठी कंपनीने विशिष्ट कॅप्सूल बनवली आहे. या कॅप्सुलमध्ये सर्वप्रकारच्या सुविधा आहेत. अंतराळाचे ३६० अंशाच्या कोनात विहंगम दृश्य या कॅप्सूलमधून पाहायला मिळेल. तसेच यात सुसज्ज टॉयलेट, वायफाय कनेक्शन आदी सुविधा असतील.

कंपनीचे सहसंस्थापक जेन पोयंटर म्हणाले की, ग्रह-ताऱ्यांच्या सहवासात लग्न करण्याची इच्छा सर्वांचीच असते. आमच्याकडे अंतराळात लग्न करण्यासाठी प्रतिक्षा यादी तयार झाली आहे. आमची उड्डाणप्रणाली वेगळी असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

जेवण, रोषणाई अन‌् शहनाईही

कंपनीने तयार केलेल्या नेपच्यून यानाच्या कॅप्सूलमध्ये आठ प्रवासी व एक वैमानिक असेल. खाद्यपदार्थांचा मेन्यू, कॉकटेल, साऊंट ट्रॅक, लायटिंग आदी तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. जे लोक पूर्ण कॅप्सूल आरक्षित करतील, त्यांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे बसवण्याची व्यवस्था करता येऊ शकेल.

logo
marathi.freepressjournal.in