इराणसोबतचा युद्धविराम समाप्त, ट्रम्प यांची घोषणा; अमेरिकेचे पुन्हा हल्ले, तेलाच्या किमती वाढल्या

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरचा तात्पुरता युद्धविराम आता संपल्याची घोषणा केली आहे. इराणशी आता मला कोणतीही चर्चा करायची नाही, ते आजारी मानसिकतेचे लोक आहेत, त्यांच्याशी व्यवहार करण्यात काहीच अर्थ नाही, अशा कठोर शब्दांत ट्रम्प यांनी अंकारा येथे नाटो शिखर परिषदेत टीका केली.
इराणसोबतचा युद्धविराम समाप्त, ट्रम्प यांची घोषणा; अमेरिकेचे पुन्हा हल्ले, तेलाच्या किमती वाढल्या
इराणसोबतचा युद्धविराम समाप्त, ट्रम्प यांची घोषणा; अमेरिकेचे पुन्हा हल्ले, तेलाच्या किमती वाढल्या
Published on

दुबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरचा तात्पुरता युद्धविराम आता संपल्याची घोषणा केली आहे. इराणशी आता मला कोणतीही चर्चा करायची नाही, ते आजारी मानसिकतेचे लोक आहेत, त्यांच्याशी व्यवहार करण्यात काहीच अर्थ नाही, अशा कठोर शब्दांत ट्रम्प यांनी अंकारा येथे नाटो शिखर परिषदेत टीका केली. भविष्यात राजनैतिक चर्चा होऊ शकतात, मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांना त्याची कोणतीही अपेक्षा नाही, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिका इराणवर आणखी लष्करी हल्ल्यांची तयारी करत आहे, असा इशाराही त्यांनी दिला. खर्ग बेटावर कबजा करण्याचीही धमकी दिली.

अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्याच महिन्यात चर्चा झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी युद्ध कायम स्वरुपी संपवण्याचा मानस व्यक्त केला होता. पण गेल्या एक ते दोन दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीत ३ जहाजांवर हल्ले झाले. त्यामुळे तणाव वाढला. यानंतर ट्रम्प यांनी इराणसोबत कोणताही करार न करण्याची भूमिका घेतली आहे.

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणकडून तीन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने एकाचवेळी इराणच्या ८० पेक्षा जास्त सैन्य तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापार सुरक्षा आणि इराणची सैन्य क्षमता कमकुवत करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचं अमेरिकी सेंट्रल कमांडने दावा केला आहे.

अंत्यसंस्कारादरम्यान संघर्ष

हा संघर्ष अशा वेळी पेटला आहे, जेव्हा इराणमध्ये त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्यासाठी अनेक दिवसांचा अंत्यसंस्कार विधी सुरू आहे. खमेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मृत्यू झाला होता. हा अंत्यसंस्काराचा काळ (जो गुरुवारी संपणार आहे) तणाव कमी करणारा ठरेल अशी अपेक्षा होती; मात्र यादरम्यान ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना मारण्याच्या घोषणा सातत्याने दिल्या जात आहेत.

अमेरिकेने इराणला कच्चे तेल विक्रीसाठी दिलेली विशेष परवानगीही रद्द केली आहे. युद्धविराम कराराचा हा महत्त्वाचा भाग होता. ही सवलत रद्द झाल्याने इराणच्या तेल निर्यातीवर पुन्हा निर्बंध लागू झाले असून, त्यामुळे जागतिक तेलपुरवठ्याविषयीची अनिश्चितता आणखी वाढली आहे.

इराणचे प्रत्युत्तर

या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरिन आणि कुवैतमध्ये असलेल्या अमेरिकन आर्मीच्या तब्बल ८५ लष्करी तळांवर मिसाइल आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ला चढवला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच हा हिंसाचार झाला. आम्ही अमेरिकेच्या धमक्यांसमोर झुकणार नाही, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in