

न्यू यॉर्क : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध आपणच थांबविल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा त्याच दाव्याची री ओढली आहे. इतकेच नव्हे तर या युद्धात सात विमाने पाडल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी आता आठ विमाने पाडल्याचा नव्याने दावा केला आहे. मात्र, नेहमीप्रमाणेच कोणत्या देशाची किती विमाने पाडण्यात आली त्याबद्दल त्यांनी चकार शब्दही उच्चारलेला नाही.
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम-मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. पाकिस्तानने युद्धबंदीची मागणी केल्यानंतर चार दिवसांनी हे युद्ध थांबले आणि दोन्ही देशांनी युद्धबंदी जाहीर केली. त्यानंतर आपणच हे युद्ध थांबवले, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. आतापर्यंत जवळपास ६० वेळा त्यांनी हा दावा केला आहे. मात्र भारताने त्यांचा हा दावा अनेकदा फेटाळून लावला आहे.
आठ विमाने पाडली
भारत आणि पाकिस्तान संघर्षात पाच सात विमाने पाडण्यात आल्याचा दावा यापूर्वी ट्रम्प यांनी केला होता. आता या संख्येत ट्रम्प यांनी वाढकेली असून आठ विमाने पाडण्यात आल्याचा नव्याने दावा केला. त्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धोरवर धरले होते. आपली पाच विमाने पडली काय, असा सवालही करण्यात आला. मात्र, मोदी सरकारने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध आपल्या मध्यस्थीमुळेच थांबल्याचा दावा केला. तसेच या संघर्षात आठ विमाने पाडल्याचा दावाही केला आहे. आधी पाच विमाने आणि आता आठ विमाने पाडल्याचा दावा केल्याने ट्रम्प यांनी आपलाच आधीचा दावा बदलला आहे. तसेच कोसोव्हो-सर्बिया आणि काँगो-रवांडा युद्ध आपणच थांबवल्याचा दावा त्यांनी केला. भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला असून पाकिस्तानच्या विनंतीमुळेच युद्ध थांबवल्याचे स्पष्ट केले. मात्र, ट्रम्प पुन्हा पुन्हा तोच दावा सातत्याने करत आहेत. जवळपास ६० वेळा त्यांनी हा दावा केला असून पाडलेल्या विमानांची संख्या आठ होती, असा नवी पुष्टीही त्याला जोडली आहे.