ट्रम्प यांचा पराभव हेच लक्ष्य - कमला हॅरिस

डेमॉक्रॅटिक पक्षाची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य राहील, अशी घोषणा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केली आहे.
ट्रम्प यांचा पराभव हेच लक्ष्य - कमला हॅरिस
Published on

वॉशिंग्टन : डेमॉक्रॅटिक पक्षाची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य राहील, अशी घोषणा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर त्यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस यांची डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीची बळकट झाली आहे.

कमला हॅरिस यांना डेमॉक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळाल्यास राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील त्या पहिल्या श्वेतवर्णीय महिला व पहिल्या आशियाई अमेरिकन असतील.

५९ वर्षीय कमला हॅरिस यांनी बायडेन यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले व बायडेन यांनी देशासाठी केलेल्या योगदानाची प्रशंसा केली. दरम्यान, बायडेन यांनी पाठिंबा दिला असला तरी हॅरिस यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता कायम आहे. डेमॉक्रॅटिक पक्ष बायडेन यांना पर्याय म्हणून निवडण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करणार यावर पक्षाचा पुढील उमेदवार निश्चित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in