अमेरिकेचा व्हिसा धडधाकट लोकांनाच मिळणार - ट्रम्प

अमेरिकेत जायचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला केवळ पैसे, बुद्धिमत्ता असून चालणार नाही तर तुम्ही धडधाकट असणे गरजेचे असेल. कारण मधुमेह, लठ्ठपणा आदी आजारी असल्यास तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. याबाबतची नवीन मार्गदर्शक तत्त्वे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने जाहीर केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेत जायचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला केवळ पैसे, बुद्धिमत्ता असून चालणार नाही तर तुम्ही धडधाकट असणे गरजेचे असेल. कारण मधुमेह, लठ्ठपणा आदी आजारी असल्यास तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. याबाबतची नवीन मार्गदर्शक तत्त्वे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने जाहीर केली.

मधुमेह, लठ्ठपणा व हृदयाशी संबंधित आजार असलेल्या परदेशी नागरिकांना परदेशी नागरिकांना व्हिसा किंवा ग्रीन कार्ड देण्यास मनाई केली जाऊ शकते. या नवीन नियमांचा परिणाम परदेशी विद्यार्थी व व कर्मचारी, पर्यटकांवर होऊ शकतो. हे सर्व नियम व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच नागरिकांना लागू होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in