इराणवर हजारो क्षेपणास्त्रे डागू - डोनाल्ड ट्रम्प

इराणने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचे सैन्य त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करेल आणि त्यासाठी एक हजार क्षेपणास्त्रे लॉक्ड अॅण्ड लोडेड (सुसज्ज) स्थितीत ठेवण्यात आली आहेत.
इराणवर हजारो क्षेपणास्त्रे डागू - डोनाल्ड ट्रम्प
इराणवर हजारो क्षेपणास्त्रे डागू - डोनाल्ड ट्रम्प
Published on

वाशिंग्टन : इराणने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचे सैन्य त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करेल आणि त्यासाठी एक हजार क्षेपणास्त्रे लॉक्ड अॅण्ड लोडेड (सुसज्ज) स्थितीत ठेवण्यात आली आहेत. केवळ एका इशाऱ्यावर इराणची राखरांगोळी केली जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. ट्रम्प यांनी - आपल्या 'टूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक - पोस्ट लिहित इराणला ठणकावले आहे.

इराणने जगातील विविध भागांतून माझी हत्या करण्याची - किंवा तसा प्रयत्न करण्याची जी धमकी दिली आहे, त्यावर - त्यांनी पाऊल उचलल्यास, इराणवर डागण्यासाठी १,००० क्षेपणास्त्रे 'लॉक्ड अँड लोडेड' ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आणखी हजारो क्षेपणास्त्रे तात्काळ पाठोपाठ डागली जातील. याबाबतचे आदेश आधीच देण्यात आले असून, अमेरिकन लष्कर एका वर्षाच्या कालावधीसाठी (जो पुढे वाढवला जाऊ शकतो) इराणचा संपूर्ण विनाश करण्यासाठी आणि त्यांचे सर्व भाग उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्णपणे तयार, इच्छुक आणि सक्षम आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in