येमेनजवळ व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला: २२ पैकी ९ कर्मचारी भारतीय; भारताने युद्धनौका पाठवली

जेन्को पिकार्डी या जहाजावर मार्शल आयलंडचा ध्वज लावला आहे.
येमेनजवळ व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला: २२ पैकी ९ कर्मचारी भारतीय; भारताने युद्धनौका पाठवली

एडन : येमेनजवळ पुन्हा एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर जहाजाला आग लागली. पण ही आग तत्काळ विझविण्यात यश आले. या जहाजावर २२ कर्मचारी असून त्यात ९ जण भारतीय आहेत.

जेन्को पिकार्डी या जहाजावर मार्शल आयलंडचा ध्वज लावला आहे. भारतीय नौदलाने सांगितले की, हा हल्ला मंगळवारी रात्री ११ वाजून ११ वाजता झाला. हल्ल्याच्या वेळी हे जहाज एडनच्या आखातात येमेनच्या अदन पोर्टवरून १११ किमी दूरवर होते. हल्ल्यानंतर या जहाजाने मदतीसाठी सिग्नल पाठवले. ड्रोन हल्ल्याची सूचना मिळाल्यावर नौदलाची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम मदतीसाठी रवाना झाली आहे. रात्री १२ वाजून ३० वाजता युद्धनौकाने जाऊन जहाजाचे निरीक्षण केले. या जहाजाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. बॉम्ब तज्ज्ञांनी सांगितले की, जहाज पुढील प्रवास सुरू ठेवू शकतो. दरम्यान, हा हल्ला कोणी केला याची माहिती मिळू शकलेली नाही.

अमेरिकेचा हुतींवर चौथ्यांदा हल्ला अमेरिकेच्या लष्कराने येमेनमध्ये हुती बंडखोरांवर चौथ्यांदा हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यात हुतींची १४ क्षेपणास्त्र व लाँचर उद‌्ध्वस्त झाले आहेत. अमेरिकेने तीन ठिकाणी टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. अरबी समुद्रात जहाजांवर होणारे हल्ले रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in