केंद्र सरकारच्या तीन जनसुरक्षा योजनांमुळे सामान्यांना विमा व पेन्शनचा होणार लाभ

केंद्र सरकारच्या तीन जनसुरक्षा योजनांमुळे 
सामान्यांना विमा व पेन्शनचा होणार लाभ

सामान्य जनतेला जन सुरक्षेचे म्हणजेच सामाजिक संरक्षणाचे कवच प्रदान करणाऱ्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) आणि अटल निवृत्तीवेतन योजना (एपीवाय) या योजनांच्या अंमलबजावणीची सात वर्षे साजरी करत असतानाच, आपण या योजनांच्या माध्यमातून किफायतशीर दरात सामान्य लोकांना पुरविण्यात आलेले जन संरक्षण म्हणजेच विमा, पेन्शनमुळे आर्थिक संरक्षणाचा लाभ मिळतो, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये ९ मे २०१५ रोजी या तिन्ही योजनांची सुरुवात करण्यात आली होती.

आकस्मिक जोखीम/ नुकसान आणि आर्थिक असुरक्षितता यांच्यापासून मानवी जीवनाला संरक्षण देण्याची गरज ओळखून नागरिकांचे कल्याण साधण्याप्रती या तिन्ही योजना समर्पित करण्यात आल्या आहेत. देशातील असंघटीत क्षेत्रात कार्यरत नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेची सुनिश्चिती करून घेण्यासाठी केंद्र सरकारने – पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) – या दोन विमा योजनांची सुरुवात केली आणि या नागरिकांच्या वृद्धापकालीन अत्यावश्यक गरजा पुरविण्यासाठी अटल निवृत्तीवेतन योजना (एपीवाय) लागू केली.

पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय या योजना सर्वसामान्यांना कमी खर्चात जीवन आणि अपघात विम्याचे संरक्षण देऊ करतात तर एपीवाय योजना त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात नियमित निवृत्तीवेतन मिळण्यासाठी आतापासून बचत करण्याची संधी देते.

या योजनांच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी किफायतशीर दरातील योजनांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत विमा आणि निवृत्तीवेतन योजनांचा लाभ पोहोचविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी जाहीर केलेल्या आर्थिक समावेशासाठीच्या राष्ट्रीय मोहिमेतील एक मुख्य उद्दिष्ट होते.”

“जन सुरक्षेविषयीच्या या तीन योजनांनी विमा तसेच निवृत्तीवेतन या गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या आहेत. गेल्या सात वर्षांत या योजनांमध्ये सहभागी झालेल्या तसेच या योजनांच्या लाभ मिळविणाऱ्या लोकांची संख्या हा या योजनांच्या यशाचा पुरावाच आहे. या कमी खर्चिक विमा योजना तसेच खात्रीलायक निवृत्तीवेतन योजना आर्थिक संरक्षणाची सुनिश्चिती करत आहेत. अशा योजनांचा लाभ पूर्वी काही निवडक लोकांनाच मिळत होता, मात्र आता त्या समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल्या आहेत,” केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या.

गरिबांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचे अवलोकन करताना अर्थमंत्री म्हणाल्या, “आज सर्वात गरीबातील गरीब व्यक्तीला देखील प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत १ रुपयापेक्षा एक रुपयापेक्षाही कमी दरात, २ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण आणि अपघात विमा मिळू शकतो. प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजनेअंतर्गत अंतर्गत दरात दरमहा किमान ४२ रुपये भरून १८ ते ४० वयोगटातील देशातील सर्व नागरिक ६० व्या वर्षांनंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनासाठी सदस्यत्व घेऊ शकतात.

जीवन ज्योती विमा योजनेचा १२.७६ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ

सुरक्षा विमा योजनेचा एकूण २८.३७ कोटी

अटल निवृत्तीवेतन योजनेत

चार कोटींहून अधिक नागरिक सहभागी

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in