
क्वालालंपूर : मलेशियाच्या दौऱ््यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी मलेशियाचे पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याविषयी चर्चा केली. त्यात संरक्षण आणि व्यूहात्मक संबंधावर विशेष भर होता.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे मलेशियाच्या तीन दिवसीय दौऱ््यावर गेले आहेत. तेथे सोमवारी त्यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहीम आणि संरक्षणमंत्री मोहम्मद हसन यांची भेट घेतली. मलेशिया आणि भारत यांच्यात १९९३ साली संरक्षण सहकार्याचा करार झाला होता. त्याला या भेटीत उजाळा देण्यात येऊन त्याची व्याप्ती वाढवण्यात आली. मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीची पुढील बैठक भारतात घेण्याचेही ठरले. मलेशियाने भारताच्या स्वदेशी तेजस लढाऊ विमानात बराच रस दाखवला आहे. त्याच्या खरेदीबाबतही यावेळी चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.