चीनमध्ये भूकंप ; १२८ जणांचा मृत्यू

या भूकंपामुळे पाणी व विजेच्या वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच वाहतूक व कम्युनिकेशन पायाभूत सुविधा उद‌्ध्वस्त झाल्या आहेत.
चीनमध्ये भूकंप ; १२८ जणांचा मृत्यू
PM

बीजिंग : चीनच्या वायव्य भागात झालेल्या मोठ्या भूकंपात १२८ जणांचा मृत्यू, तर २०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची रिश्टर स्केलवरील क्षमता ६.२ होती.

चीनची अधिकृत वृत्तसंस्था ‘जिन्हुआ’ने सांगितले की, घांसू प्रांतात झालेल्या भूकंपात १०० जणांचा मृत्यू, तर ९६ जण जखमी झाले, तर क्विनघाई प्रांतात १६ जणांचा बळी, तर १२४ जण जखमी झाले आहेत. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने या भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल नोंदवली.

या भूकंपामुळे पाणी व विजेच्या वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच वाहतूक व कम्युनिकेशन पायाभूत सुविधा उद‌्ध्वस्त झाल्या आहेत.

या भागात भूकंपानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हॉस्टेलबाहेर पळ काढला. तंबू, बेड‌्स‌ आदी जीवनोपयोगी मदत साहित्य घटनास्थळी पाठवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in