नाणे निधीकडून पाकची आर्थिक नाकाबंदी ;परकीय कर्जाची आवश्यकता २५ अब्ज डॉलरवर खाली आणली

पाकिस्तानचे वित्त सचिव इमदादुल्ला बोसल यांनी गुरुवारी सांगितले की अंतरिम सरकार सहजतेने चालू राहण्यासाठी आवश्यक वित्तपुरवठा सुरक्षित करू शकेल
नाणे निधीकडून पाकची आर्थिक नाकाबंदी
;परकीय कर्जाची आवश्यकता २५ अब्ज डॉलरवर खाली आणली

इस्लामाबाद : पाकिस्तानला परदेशी कर्जाची आवश्यकता कमी करून ती २५ अब्ज डॉलरपर्यंत असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे. यामुळे आर्थिक चणचणीने ग्रस्त असलेल्या पाकिस्तानाला ३.४ अब्ज डॉलरचा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पाकिस्तानची ही आवश्यकता कमी केल्याचे एक्स्प्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने दिलेल्या एका बातमीत म्हटले आहे.

केवळ इतकेच नव्हे तर पाकिस्तानच्या आर्थिक वृद्धीचा अंदाजही दोन टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. यामध्ये पाकिस्तान सरकारचा बह्य आणि ढोबळ आर्थिक अंदाजही नाणे निधीने नाकारले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे शिष्टमंडळ सुमारे दोन आठवड्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर असून पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा त्यांनी केल्या आहेत. तसेच आधीच मान्य केलेल्या ३ अब्ज डॉलर कर्जाच्या दुसऱ्या टप्प्यात ७०० दशलक्ष डॉलर जारी करण्यास सक्षम होण्याच्यादृष्टीने प्राथमिकस्तरीय कराराप्रत काही घडामोडी झाल्या आहेत, असे वृत्त आहे.

अहवालात असे म्हटले आहे की या वर्षी जुलैच्या तुलनेत, आंतरराष्ट्रीय नाणे निधीने या आर्थिक वर्षासाठी परदेशी कर्जाची आवश्यकता २८.४ अब्ज डॉलरवरून २५ अब्ज डॉलरवर आणली आहे. चार महिन्यांत, सरकारने आधीच ६ अब्ज डॉलर कर्ज घेतले आहे तर त्याला १२.५ अब्ज डॉलर रोलओव्हर अपेक्षित आहे. ते सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांव्यतिरिक्त उर्वरित गरजा ६.५ अब्ज डॉलरची आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानचे वित्त सचिव इमदादुल्ला बोसल यांनी गुरुवारी सांगितले की अंतरिम सरकार सहजतेने चालू राहण्यासाठी आवश्यक वित्तपुरवठा सुरक्षित करू शकेल. मात्र सरकारला फारसा दिलासा मिळणार नाही कारण फ्लोटिंग युरो बॉन्ड्सद्वारे आणि परदेशी व्यावसायिक बँकांकडून कर्ज घेण्याच्या अडचणींमुळे अंदाजे उपलब्ध वित्तपुरवठा ३.७ अब्ज डॉलरने कमी झाला आहे.

सूत्रांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय नाणे निधीने या आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या ४ अब्ज डॉलर ते ४.५ अब्ज डॉलरच्या चालू खात्यातील तूट ६.५ अब्ज डॉलरच्या आधीच्या अंदाजित आकडेवारीच्या तुलनेत मान्य केलेली नाही. तर नाणे निधीने आता ५.७ अब्ज डॉलरची तूट वर्तविली असून त्यांच्या जुन्या अंदाजाच्या तुलनेत ७७० दशलक्ष चॉर इतकी त्यात घट आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in