इलॉन मस्कने केली मोठी घोषणा! 'एक्स'च्या फ्री यूजर्ससाठी आणखी एक फीचर बंद

एक्सच्या फ्री यूजर्सना आता या प्लॅटफॉर्मवरील पोल्समध्ये सहभाग घेता येणार नाही.
इलॉन मस्कने केली मोठी घोषणा! 'एक्स'च्या फ्री यूजर्ससाठी आणखी एक फीचर बंद

इलॉन मस्कने एक्स (ट्विटर) विकत घेतल्यापासून अ‍ॅपमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. अ‍ॅपच्या नावापासून लोगोही बदलला आहे. तसंच व्हेरिफिकेशनसाठी देखील यूजर्सना पैसे द्यावे लागत आहेत. एक्सचे अनेक फीचर्स फक्त ब्लू टिक असणाऱ्या यूजर्सपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत. आता या सर्वामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. एक्सच्या फ्री यूजर्सना आता या प्लॅटफॉर्मवरील पोल्समध्ये सहभाग घेता येणार नाही. बॉट्सच्या वापराने पोल्सचे रिझल्ट बदलू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मस्कने स्पष्ट केलं आहे.

आता एक्सवर कोणता प्रश्न विचारून, त्यावर फक्त होय-नाही किंवा बहुपर्याय देऊन लोकांची मतं घेतली जातात. या पोल्सचा वापर कित्येक वेळा रिसर्चसाठी देखील करण्यात आला आहे. मात्र, कित्येक वेळा बॉट्सचा वापर करून याचे परिणाम बदलले जातात. हेच टाळण्यासाठी आता मस्कने हा नवीन नियम लागू केला आहे.

यानंतर आता केवळ व्हेरिफाईड यूजर्स एखाद्या पोलमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. यामुळे अधिक योग्य परिणाम मिळणार आहेत. मोठे उद्योगपती ब्रायन कॅसेन्स्टीन यांनी याबाबत पोस्ट केली होती. पोलमध्ये केवळ व्हेरिफाईड यूजर्सना सहभागी होता यायला हवं, असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं. तर, इलॉन मस्कने यावर रिप्लाय देत, हा अपडेट लवकरच समोर येणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, एक्सवर लवकरच आणखी फीचर येणार आहे. तो म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचा फीचर येणार असल्याचंही इलॉन मस्कने याआधी सांगितलं आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर न घेताही आपण एक्सवरुन त्या व्यक्तीला थेट कॉल करू शकणार आहोत.अँड्रॉईड, अ‍ॅपल, मॅक आणि विंडोज अशा सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in