ट्विटरच्या 'चिमणी'ची जागा घेतली X ने ; ट्विटरचा नवा लोगो युजर्सच्या भेटीला

मस्कने आपल्या बहुतांश कंपन्यांच्या लोगोमध्ये X चा वापर केला आहे
ट्विटरच्या 'चिमणी'ची जागा घेतली X ने ; ट्विटरचा नवा लोगो युजर्सच्या भेटीला
Published on

ट्विटर विकत घेतल्यापासून इलॉन मस्क यांनी सतत काहीना काही बदल करायला सुरुवात केली आहे. आता मस्क यांनी ट्विटरचा लोगो असलेली चिमणी बदलली आहे. त्या चिमणीची जागा आता X ने घेतली आहे. एवढच काय मस्कने आपल्या बहुतांश कंपन्यांच्या लोगोमध्ये X चा वापर केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नव्या लोगोवर देखील X चे वर्चस्व आहे.

मेटा कंपनीने ५ जुलै रोजी थ्रेड ॲप लाँच केलं असून या ॲपने थोड्याच दिवसात ट्विटरच्या युजर्सना भुरळ पाडली. यामुले ट्विटरच्या युजर्समध्ये घट झाली. याचा धसका इलॉन मस्क यांनी घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. युजर्स ट्विटर सोडून जाऊ नयेत यासाठी मस्कने हे बदल केल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटर कंपनीने जाहिरातींचा काही भाग निर्मात्यांना शेअर करेल असं सांगितलं होतं. तसंच इलॉन मस्कने ट्वविट वाचण्याची मर्यादा आणि कमाई धोरण बदललेल आहे.

नवीन लोगो एक्सच का ?

एलॉन मस्क यांचा एक्स अक्षराशी संबंध १९९९ सालापासून आहे. तेव्हा त्यांनी एक्स.कॉम नावाची ऑनलाईन बँकिंग कंपनी तयार केली. नंतर त्यांनी ती पेपाल बनलेल्या दुसऱ्या कंपनीत विलीन केली. २०१७ मध्ये मस्क यांनी पेपालकडून यूआरएल "एक्स.कॉम" पुन्हा खरेदी केली. त्यांनी ट्विट केले की, डोमेन त्यांच्यासाठी "उत्तम भावनात्मक मूल्य" आहे. त्याचवेळी जेव्हा एलॉन मस्क यांनी लिंडा याकिरानो यांना ट्विटरची नवीन सीईओ बनवले, तेव्हा त्यांनी ट्विट केले की, या प्लॅटफॉर्मचे एक्स, एव्हरीथिंग अॅपमध्ये रूपांतर करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे. एक्स त्यांची दुसरी कंपनी स्पेसएक्स मध्येदेखील दिसून येत आहे. २०२० मध्ये मस्क यांनी त्यांच्या एका मुलाचे नाव एक्स Æए-१२ मस्क ठेवले.

logo
marathi.freepressjournal.in