Elon Musk Twitter Layoff: का वाढतेय ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची चिंता? इलॉन मस्क काही कर्मचाऱ्यांना काढून टाकणार?

इलॉन मस्कने (Elon Musk) तब्बल ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर (Twitter) खरेदीचा करार केलेला आहे. तसेच, नफा मिळवण्यासाठी कंपनीत मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करत असल्याचा अंदाज
Elon Musk Twitter Layoff: का वाढतेय ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची चिंता? इलॉन मस्क काही कर्मचाऱ्यांना काढून टाकणार?

प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क (Elon Musk) हे ट्विटरचे (Twitter) बॉस झाल्यानंतर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. कंपनीमध्ये लवकरच टाळेबंदी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना एक ईमेल पाठवला असून त्यांची नोकरी कायम राहणार की नाही याची माहिती त्यांना दिली जाणार आहे.

कंपनीने कर्मचाऱ्यांना केलेल्या मेलमध्ये म्हंटले आहे की, तुम्ही जर ऑफिसला येत असाल तर तिथूनच घरी परत जा आणि मेलची वाट पहा. यानंतर आता सर्व कर्मचाऱ्यांना आपली नोकरी राहणार की जाणार? याची चिंता सतावत आहे. दरम्यान, इलॉन मस्कने (Elon Musk) तब्बल ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर (Twitter) खरेदीचा करार केलेला आहे. तसेच, नफा मिळवण्यासाठी कंपनीत मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उद्योजक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच कंपनीमध्ये अनेक उलथापालथ झाली. तर, काही कर्मचाऱ्यांना पाणउतारा व्हावे लागेल असा अंदाजदेखील काहींनी वर्तवला होता. सीईओ पराग अग्रवाल, कायदेशीर कार्यकारी अधिकारी विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि जनरल काउंसिल सीन एजंट यांना अवघ्या एका आठवड्यातच नारळ देण्यात आला. इलॉन मस्क यांच्याकडून घेतलेल्या या कठोर निर्णयांवर जगभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in