इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला बसला मोठा आर्थिक फटका

अग्निशामक बंबांच्या मदतीने पबला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला बसला मोठा आर्थिक फटका
Published on

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची भागीदारी असलेल्या पबला आग लागल्याने या दिग्गज खेळाडूला मोठा आर्थिक फटका बसला. आठ अग्निशामक बंबांच्या मदतीने पबला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. पबच्या छताचे आणि पहिल्या मजल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

‘मिरर डॉट को डॉट युके’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नॉटिंगहॅमशायरमधील अप्पर ब्रॉटन, ईस्ट मिडलँड्स परिसरात असलेल्या पबचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ‘टॅप अॅण्ड रन’ असे नाव असलेला हा पब स्टुअर्ट ब्रॉड आणि त्याचा नॉटिंगहॅमशायरमधील माजी सहकारी हॅरी गर्ने यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येते. नॉटिंगहॅमशायर फायर अॅण्ड रेस्क्यू स्टेशन मॅनेजर जोनाथन विल्सन यांनी सांगितले की, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. स्टुअर्ट ब्रॉड सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने ट्विटरवर लिहिले की, मला मिळालेल्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. मला अजूनही खात्री वाटत नाही. नॉटिंगहॅमशायर अग्निशमन सेवेने अतुलनीय प्रयत्न केले. यावेळी गावकऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. ब्रॉडचा संघातील सहकारी असलेल्या जेम्स अँडरसनने सांगितले की, कोणालाही इजा न झाल्यामुळे ब्रॉड समाधानी आहे; मात्र तो नाराज झाला आहे. कारण पब त्याच्या आणि हॅरीच्या आयुष्याचा मोठा भाग आहे. पबला आग लागल्याची वाईट बातमी मिळूनही ब्रॉडने ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी चमकदार कामिगरी केली. खेळ केला. त्याने २६ षट्के टाकत १०७ धावांमध्ये दोन बळी टिपले.

logo
marathi.freepressjournal.in