रशियन हल्ल्यात युरोपचा मोठा स्टील प्लांट उद‌्ध्वस्त

रशियन हल्ल्यात युरोपचा 
मोठा स्टील प्लांट उद‌्ध्वस्त

किव्ह

युक्रेनमध्ये रशियन सैन्यदलाच्या हल्ल्यात मारियापोल येथील युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लांट उद‌्ध्वस्त झाला आहे. या स्टील प्लांटवर ताबा मिळवण्यासाठी रशिया व युक्रेन या देशांमध्ये मोठा संघर्ष झाला.

युक्रेनचे खासदार लेसिया वासिलेंको यांनी सांगितले की, “युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लांट नष्ट झाला. त्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा फटका पर्यावरणालाही बसला आहे.”

युक्रेनी नागरिकांची उपासमार

दोनेत्सक येथील सैन्य व नागरिक प्रशासन प्रमुख पावलो किरिलेंको यांनी सांगितले की, “हजारो मारियूपोलचे नागरिक रशियन हल्ल्यातून वाचले आहेत. आता ते रशियन सैन्याने कब्जा केलेल्या मानहुशी व मेलेकिन येथे उपाशी मरत आहेत. रशियन सैन्याने जेवण, पाणी व सुरक्षित मार्ग देण्यास त्यांना नकार दिला आहे. त्यामुळे मारियूपोलमध्ये राहणाऱ्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे.”

logo
marathi.freepressjournal.in