गाझातील अल-शिफा रुग्णालयातून कर्मचाऱ्यांचे स्थलांतर

गाझा पट्टीतील अल-शिफा रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली.
गाझातील अल-शिफा रुग्णालयातून कर्मचाऱ्यांचे स्थलांतर

तेल अवीव : इस्रायलच्या सैन्याने केलेल्या कारवाईनंतर गाझा पट्टीतील अल-शिफा रुग्णालयाच्या कर्मचारी आणि तेथे भरती केलेल्या रुग्णांनी शनिवारी पायी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या सैन्याने तेथून निघून जाण्याचा आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर इस्रायलच्या सैन्याने त्याचा इन्कार केला असून रुग्णालयाच्या प्रशासनानेच बाहेर पडू देण्याची विनंती केली होती, असे म्हटले आहे.

गाझा पट्टीतील अल-शिफा रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. या हल्ल्यात बऱ्याच सामान्य नागरिकांचा आणि रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, या रुग्णालयाच्या आडून हमास तेथे त्यांचा तळ चालवत होता, असा आरोप इस्रायलने केला आहे. रुग्णालयाखालील भुयारांमध्ये हमासचा नेता याह्या सिन्वर लपला असावा, असा इस्रायलच्या सेनादलांचा कयास होता. त्यामुळे तेथे हल्ला केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत १२ हजारांहून अधिक नागरिक मरण पावले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in