‘एक्स’वर प्रत्येक कामासाठी पैसे लागणार; एलन मस्क यांची घोषणा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट टाकायला, प्रतिक्रिया द्यायला आणि बुकमार्क करायला पैसे द्यावे लागणार आहेत...
‘एक्स’वर प्रत्येक कामासाठी पैसे लागणार; एलन मस्क यांची घोषणा

वॉशिंग्टन : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट टाकायला, प्रतिक्रिया द्यायला आणि बुकमार्क करायला पैसे द्यावे लागणार आहेत. ‘एक्स’चे मालक एलन मस्क यांनी आपल्या हँडलवर एका युजर्सच्या पोस्टला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली.

कंपनी ‘एक्स’ वापरकर्त्यांवर शुल्क लावण्याचे नियोजन करत आहे. किती व कधीपासून हे शुल्क लागणार याची माहिती दिलेली नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून कंपनीने न्यूझीलंड व फिलिपीन्स येथे पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कंपनीने वर्षाला एक डॉलर शुल्क आकारले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in