रशियात गॅस स्टेशनमध्ये स्फोट

३० जणांचा मृत्यू ; १०२ जखमी
रशियात गॅस स्टेशनमध्ये स्फोट

मॉस्को : रशियाच्या मखाचकाला शहरात एका गॅस स्टेशनमध्ये स्फोट होऊन ३० जणांचा मृत्यू झाला आणि १०२ जण जखमी झाले आहेत.

मखाचकाला शहरातील महामार्गावर एका कार दुरुस्ती दुकानाला आग लागली. ती आग गॅस स्टेशनपर्यंत पोहोचली. तेथे मोठा स्फोट झाला. तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.

logo
marathi.freepressjournal.in