
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये मंगळवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात १४ हुन जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर १००हून जण अधिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट ५ मजली इमारतीत झाला असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट मंगळवारी संध्याकाळी ५च्या सुमारास झाला. स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक पोलिसांनी माहिती दिली की, जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, अद्याप या मागचे कारण समोर आलेले नाही.