दावोस : हवामान संकटामुळे तीव्र झालेल्या आपत्तींमुळे २०५० पर्यंत १२.५ ट्रिलियन डॉलर्सचे आर्थिक नुकसान आणि होऊ शकते तसेच जगभरात १४.५ दशलक्ष मृत्यू होऊ शकतात, असा इशारा मंगळवारी जागतिक आर्थिक मंचाच्या एका नवीन विश्लेषणाने दिला आहे.
विश्लेषणातून जरी हा निष्कर्ष निघत असला तरी या अंदाजांना तोंड देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर हवामान बदलाचे आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी जागतिक भागधारकांना निर्णायक आणि धोरणात्मक कारवाई करण्यासाठी अजूनही वेळ आहे, असाही एक प्रकारचा दिलासा त्यात देण्यात आला आहे. ऑलिव्हर वायमन यांच्या सहकार्याने विकसित केलेला, मानवी आरोग्यावरील हवामान बदलाचा परिणाम प्रमाणीकरण करणारा अहवाल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठक २०२४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. हवामानातील बदलामुळे मानवी आरोग्यावर, जागतिक अर्थव्यवस्था आणि जगभरातील आरोग्य सेवा प्रणालींवर होणाऱ्या अप्रत्यक्ष परिणामांचे तपशीलवार चित्र प्रदान करून नवीन दृष्टिकोनातून हवामान संकटाचे विश्लेषण केले.
हवामान बदलाचा निसर्ग आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल बरीच चर्चा झाली असली तरी, पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचे काही अत्यंत गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर आणि जागतिक आरोग्य सेवा प्रणालीवर होतील, असे केंद्राचे प्रमुख तसेच आरोग्य व आरोग्यसेवेसाठी आणि जागतिक आर्थिक मंचामधील कार्यकारी समितीचे सदस्य श्याम बिशेन म्हणाले. उत्सर्जन कमी करणे आणि कमी करण्याच्या उपायांमध्ये सुधारणा केल्याशिवाय गत्यंतर नाही त्यासाठी हवामान लवचिक आणि अनुकूल आरोग्य प्रणाली तयार करण्यासाठी निर्णायक जागतिक कृती होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.