वीज वायरलेस होणार! वायर, प्लगची गरज नाही, फिनलंडने लावला नवीन शोध

तारेशिवाय वीज येऊ शकत नाही, हे आपण लहानपासून ऐकत आलो आहोत. वीज पोहचवण्यासाठी तारांचा वापर अत्यावश्यक असतो. त्यातूनच आपल्या घरातील वीजेच्या वस्तू चालतात. आता वायफायद्वारे आपण इंटरनेट चालवतो तशीच वीजही आपल्या घरात वायरलेस पद्धतीने येण्याचा दिवस दूर नाही. हे शक्य आहे का ? तर याचे उत्तर हो असेच आहे. फिनलंडने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

हेलसिंकी: तारेशिवाय वीज येऊ शकत नाही, हे आपण लहानपासून ऐकत आलो आहोत. वीज पोहचवण्यासाठी तारांचा वापर अत्यावश्यक असतो. त्यातूनच आपल्या घरातील वीजेच्या वस्तू चालतात. आता वायफायद्वारे आपण इंटरनेट चालवतो तशीच वीजही आपल्या घरात वायरलेस पद्धतीने येण्याचा दिवस दूर नाही. हे शक्य आहे का ? तर याचे उत्तर हो असेच आहे. फिनलंडने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे.

सध्या फोनवरून आपण एकमेकांना दूरध्वनी करतो, इंटरनेट चालवतो त्याचप्रमाणे वीजही तारेशिवाय आपल्याला मिळणार आहे. फिनलंडने वायरलेस ऊर्जा वितरण क्षेत्रात पुढे जात आहे. येथील वैज्ञानिकांनी वायर, प्लग किंवा सॉकेटशिवाय हवेतून वीज पाठवण्याचा चंग बांधला आहे. पण, फिनलंड येथील आल्टो विद्यापीठ, हेलसिंकी विद्यापीठ, ओउलू विद्यापीठातील संशोधनाने हे प्रत्यक्षात उतरले आहे.

२०२५-२६ मध्ये अल्ट्रासॉनिक साऊंड व्हेजमधून (ध्वनी तरंग) ‘एकॉस्टीक वायर’ बनवणे, लेजर व रेडिओ फ्रीक्वेन्सीतून वीज हवेतून पाठवणे व हाय फ्रीक्वेन्सी मॅग्नेटिक फील्डचा वापर करणे आदी शोध लागले आहेत.

विद्युत चुंबकीय क्षेत्र वायरलेस ऊर्जा कशी बनवते?

वायरलेस चार्जिंगमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक (विद्युत चुंबकीय)फील्ड्सचा वापर केला जातो. यात एका बाजूने ट्रान्समीटर वीज पाठवतो तर दुसऱ्या बाजूचा ‘रिसीव्हर’ त्याला पकडतो.

फिनलँडने रजोनेंट कपलिंग व मॅग्नेटिक इंडक्शन वर खास लक्ष दिले आहे. कारण ट्रान्समीटर व रिसीव्हरला एकाच फ्रीक्वेन्सीवर आणावे लागते. तेव्हाच कार्यक्षमता व्यवस्थित राहते.

आल्टो विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या संशोधनात सुधारणा झाल्या आहेत. आता डिवाईस कुठेही असू देत किंवा ते कुठेही फिरू देत. ते चार्ज होऊ शकते. नुकत्याच या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. छोटी यंत्रे, वेअर हाऊस यंत्रमानव व सेन्सर हवेतून वीज घेताना दिसून आले.

आल्टो विद्यापीठाने ‘सॉलटेक रोबोटिक्स’ च्या बरोबर चाचण्या केल्या. त्यात यंत्रमानव हे कोणत्याही स्थिर जागी न राहता चार्ज होत होते. जवळपास ८० टक्क्यांहून अधिक कार्यक्षमता दिसून आली.

आतापर्यंत वायरलेस वीज घरात का नाही?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे तंत्रज्ञान कमी अंतर व कमी ऊर्जेसाठी (१ केव्ही ते २० केव्ही) उपयुक्त आहे. अंतर वाढल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते. उच्च दाबाच्या वीजेसाठी अजूनही चांगल्या पायाभूत सुविधांची गरज आहे. तसेच या प्रयोगाचा मानवी शरीरावर कोणता प्रभाव पडतो, यावर संशोधन सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर घर, कार व संपूर्ण शहरात वायरलेस वीज येण्यास आणखी काही वर्षे लागू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in