यूएईत उभारले पहिले हिंदू मंदिर; पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन

एप्रिल २०१९ मध्ये यूएईच्या पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन झाले. ५ हजार बीएपीएस भक्त या कार्यक्रमाला सहभाग झाले होते.
यूएईत उभारले पहिले हिंदू मंदिर; पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन

अबुधाबी : जानेवारीत अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली. आता १४ फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या मंदिराची उभारणी बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने केली (बीएपीएस) आहे.

यूएईची राजधानी अबुधाबीत ‘अल वाकबा’ या भागात हे मंदिर उभारले आहे. २० हजार चौरस मीटर क्षेत्रावर हे मंदिर बांधले आहे. हे हिंदू मंदिर २०२३ मध्ये पूर्ण झाले. मात्र, याची संकल्पना १९९७ मध्ये बीएपीएस या संस्थेचे तत्कालीन प्रमुख स्वामी महाराज यांनी केली. या मंदिराची उंची १०८ फूट असून त्यासाठी १८ लाख विटा लागल्या आहेत.

२०१९ मध्ये मंदिराचे भूमिपूजन

एप्रिल २०१९ मध्ये यूएईच्या पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन झाले. ५ हजार बीएपीएस भक्त या कार्यक्रमाला सहभाग झाले होते. भूमिपूजन झाल्यानंतर भारतातील प्रमुख तीन नद्या गंगा, यमुना व सरस्वतीतील पाणी दगडांवर अर्पित केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला भारत, अमेरिका, ब्रिटेन, युरोप, जपान, आफ्रिका, चीन, दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया व अन्य देशातील भक्तांनी व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. भूमिपूजनानंतर २०२० मध्ये भारतात दगडातून मूर्ती साकारण्याचे काम सुरू होते. पारंपरिक शिला मंदिर शैलीत हे मंदिर साकारले. या मंदिर परिसरात वाचनालय, कक्षा, सामुदायिक केंद्र, सभास्थल, रंगभूमी आदी उभारल्या आहेत.

ऑगस्ट २०२३ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले. मंदिराच्या प्रशासनाने ‘वाळवंटात कमळ’ उभारले असे मंदिराच्या प्रशासनाने सांगितले. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या मंदिराचे उद्घाटन केले जाईल, हे जाहीर केले. २७ डिसेंबर २०२३ रोजी बीएपीएसचे स्वामी ईश्वरचरणदास व स्वामी ब्रह्मविहारिदास यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले.

यूएई सरकारने दिली जमीन

ऑगस्ट २०१५ मध्ये संयुक्त अरब अमिराती सरकारने अबुधाबीत मंदिर बनवण्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेतला. १६ ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली. या निर्णयानंतर २०१७ मध्ये अबुधाबीच्या राजकुमाराने शाही आदेश काढून ही जमीन भेट म्हणून दिली. २०१८ मध्ये अबुधाबीच्या राजकुमाराने पंतप्रधान मोदींसोबत मंदिरासाठी सहमती दिली. त्याचवर्षी मोदी यांनी अबुधाबी हिंदू मंदिराच्या कामाला सुरुवात केली.

हे आहे मंदिराचे वैशिष्ट्य

हे मंदिर १०८ फूट उंच असून त्यात ४० हजार चौरस फूट संगमरवराचा वापर केला असून १ लाख ८० चौरस फूट बलुआ दगड, १८ लाख विटांचा वापर केला आहे. मंदिरात ३०० सेन्सर्स लावले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in