आकाशातून ४२ किमी उंचीवरून उडी घेणारी पहिली भारतीय महिला

प्रशिक्षणाच्या काळात आम्हाला अशा अनेक उंच उंच उड्या माराव्या लागणार आहेत
आकाशातून ४२ किमी उंचीवरून उडी घेणारी पहिली भारतीय महिला

न्यूयॉर्क : कोलंबिया स्पेस शटलमधून अंतराळयात्रा करून पृथ्वीवर परतत असताना २००३ साली पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला स्पेस शटल जळाल्यामुळे दुर्दैवाने मृत्यू पावली होती. आता स्वाती वार्शने नावाची एक भारतीय तरुणी आकाशात पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरमधून म्हणजे तब्बल ४२.५ किमी उंचीवरून पृथ्वीवर झेपावणारी पहिली भारतीय महिला ठरणार आहे. एकूण तीन महिला स्कायडायव्हर्स २०२५ साली या उंचीवरून पृथ्वीवर उडी घेणार आहेत. त्यात स्वाती यांची रायझिंग युनायटेड संस्थेने निवड केली आहे. हा एक विक्रम ठरणार असून त्याची गिनिज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.

रायझिंग युनायटेड ही ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित या क्षेत्रात इच्छुक महिलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेने आपल्या ‘हेरा रायझिंग’ उपक्रमासाठी तीन तरुणींची निवड केली आहे. या तरुणी पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरमधून म्हणजे जमिनीपासून ४२.५ किमी अंतरावरून पृथ्वीवर झेपावणार आहेत. रायझिंग युनायटेड संस्थेने एक्सला याबाबत माहिती दिली. संस्था म्हणाली की, आम्ही हेरा रायझिंग उपक्रमाबाबत खूपच उत्सुक आहोत. पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरमधून प्रथमच महिला झेपावणार आहेत. यासाठी स्वाती आर्शने, इलियाना रॉड्रिक्स आणि डायना व्हॅलरीन जिमेनेझ या तीन तरुणींची निवड करण्यात आली असून त्यांना १८ महिने कठोर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या तीनपैकी एकीलाच आकाशातून झेपावण्याची संधी देण्यात येणार आहे, तर उर्वरित दोघी तिला जमिनीवरून सहकार्य करणार आहेत.

स्ट्रॅटोस्फिअर हा पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे दुसरे वलय असून ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२ ते ५० किमीपर्यंत पसरलेले असते. या वलयातील तापमान किमान उणे ८० डिग्री सेल्सिअस असते.

उंच तिचा झोका

या उपक्रमासाठी निवड झालेली स्वाती आर्शने या मूळ भारतीय तरुणीने अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एमआयटीतून मटेरियल सायन्स या विषयात पीएचडी केली आहे. स्कायडायव्हिंगची तिला आवड आहे. आपण जोडीने स्कायडायव्हिंग केले आहे. आपल्याला अशी मुक्तपणे उडी मारायला खूप आवडते, असे स्वातीने म्हटले आहे. स्वातीने १२०० पेक्षा अधिक वेळा हवेतून मुक्तपणे उड्या मारल्या आहेत. प्रशिक्षणाच्या काळात आम्हाला अशा अनेक उंच उंच उड्या माराव्या लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in