पाकिस्तानात पाच दहशतवादी चकमकीत ठार

दक्षिण वझिरिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अस्थिर टँक जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली.
पाकिस्तानात पाच दहशतवादी चकमकीत ठार

पेशावर : वायव्य पाकिस्तानमध्ये कारवाईदरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान पाच वाँटेड दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराने शनिवारी दिली. दक्षिण वझिरिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अस्थिर टँक जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली.

सैन्याने या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या वृत्तावरून कारवाई सुरू केली. गोळीबारात पाच अतिरेकी ठार झाले, अशी माहिती लष्कराच्या मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दिली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in